बिग बॉस

Big Boss Marathi 5: दुसऱ्यांदा कॅप्टनसी मिळवताच अरबाजने घेतली घरातून एक्झिट, निक्कीला अश्रू अनावर

Published by : Team Lokshahi

बिग बॉस मराठी 5 चा आठवा आठवडा नुकताच पार पडला आणि आठव्या आठवड्यात बिग बॉसच्या घरात शनिवार आणि रविवार या दोन दिवशी "नवरा माझा नवसाचा 2" या चित्रपटाची टीम आली होती. या टीमसोबत घरातील सदस्यांनी खुप मज्जा मस्ती केल्याचं पाहायला मिळालं. तर घरातील सदस्यांसह "नवरा माझा नवसाचा 2" या टीमने अनेक गेम देखील खेळले ज्यात कधी ए टीम तर कधी बी टीम विजय मिळवताना पाहायला मिळाली. तर काल आणि पर्वाच्या भागात बिग बॉसच्या घरात एलिमिनेशन झालेलं पाहायला मिळालं. ज्यात पहिला संग्रामला घरातून बाहेर जावं लागलं होतं, त्याच्या हाताला दुखापत झाल्यामुळे त्याला त्याचा प्रवास लवकर संपवावा लागला होता. तर त्याच्यानंतर एक एलिमिनेशन गेम झाला, ज्याची थीम "जंगलराज" ही होती.

या गेममध्ये नॉमिनेशन कार्य "शिकाऱ्याची बंदूक" हे होत. तर या गेममध्ये सुरज चव्हाण, वर्षा उसगांवकर, जान्हवी किल्लेकर, अरबाज पटेल आणि निक्की तांबोळी हे नॉमिनेट झाल्याचं पाहायला मिळालं होते. त्यानंतर कालच्या आणि पर्वाच्या भागात रितेश देशमुख काही कारणाने उपस्थित नसल्यामुळे भाऊचा धक्का होऊ शकला नाही. त्यामुळे बिग बॉसने घरातील नॉमिनेट झालेल्या सदस्यांना अॅक्टिव्ह रुममध्ये बोलावलं होतं आणि त्यादरम्यान नॉमिनेट झालेल्या प्रत्येक सदस्या समोर एक सुटकेस बॅग होती ज्यात सेफ की अनसेफ असं लिहलेलं होत.

ज्या सदस्याचे नाव बिग बॉस घेत होते त्या सदस्याने एक-एक करून स्वतः समोर असलेली सुटकेस उघडली आणि त्यानुसार सुरज चव्हाण, वर्षा उसगांवकर, जान्हवी किल्लेकर हे तिघे सेफ झाल्याचे पाहायला मिळाले, तर अरबाज पटेल आणि निक्की हे दोघे डेंजर झोनमध्ये पाहायला मिळाले. मात्र कमी वोट्स पडल्यामुळे अरबाज पटेलचा बिग बॉसच्या घरातील प्रवास आठव्या आठवड्यात येऊन संपल्याचं पाहायला मिळालं. तर नुकताच अरबाज दुसऱ्यांदा कॅप्टनसीचं पद मिळवणारा पहिला सदस्य ठरला होता. मात्र तरी देखील त्याला बिग बॉसच्या घरातून निरोप घ्यावा लागला आहे, तर अरबाज एलिमिनेट झाल्यामुळे निक्कीला अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळालं.

Bharat Gogawale : आमदार भरत गोगावलेंचा मोठा गौप्यस्फोट | Marathi News

Sangli : सांगली जिल्ह्यात पावसाचे थैमान; पावसामुळे ओढ्या नाल्यांना पूर

Navra Maza Navsacha 2 : "नवरा माझा नवसाचा २"ला बॉक्स ऑफिसवर दमदार प्रतिसाद

Snake in the train: Garib Rath Express मध्ये चक्क साप | Marathi News

MIM MP Imtiaz Jaleel Organises Tiranga Rally: MIMची संभाजीनगर ते मुंबई तिरंगा रॅली